बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, गेल्या काही काळापासू अनुष्काने काही पोस्ट केलं की तिचे चाहते आता आपल्याला तिच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती मिळेल असे नेहमी म्हणतात. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनुष्काने तिच्या आगामी चित्रपटाविषयी घोषणा केली आहे. मात्र, यावेळी तिला ट्रोल केलं आहे.
अनुष्काने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून छकडा एक्सप्रेस या तिच्या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला. हा चित्रपट माजी भारतीय महिला टीमच्या कर्णधार झुलन गोस्वामीवर आधारीत आहे. या टीझरमध्ये अनुष्काच्या हातात बॅट असून ती मैदानात आहे. हा टीझर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे तर काही नेटकऱ्यांना हा आवडलाच नाही. अनुष्काचा ना रंग, ना तिची उंची आणि ना ही तिची बंगाली भाषा ही झुलन गोस्वामींसारखी आहे, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा : शिवानी रांगोळे होणार या लोकप्रिय अभिनेत्रीची सून, केली साखरपुड्याची घोषणा
आणखी वाचा : ‘कपिल शर्मा शो’मध्ये काम केलेल्या ‘या’ अभिनेत्याने केले विष प्राशन!
आणखी वाचा : ‘तुला तुझ्या पायावर उभं रहायचं आहे…’, समांथाने केला प्रियांकाचा तो व्हिडीओ शेअर
काही नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल केले आहे. एक नेटकरी तिला ट्रोल करत म्हणाला की, “उंची सारखी नाही, रंग सारखा नाही, बंगाली बोलण्याची पद्धत सारखी नाही, अनुष्का या व्हिडीओत झुलन गोस्वामी सोडून सगळं दिसते.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हा चित्रपट फ्लॉप करणार. हिच्या जागेवर झुलनला घेतलं असतं, त्या अभिनयपण चांगला करतात.” तिसरा नेटकरी म्हणाला, “अरे झुलन आणि अनुष्का कुठे एक सारख्या दिसतात.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हे सगळं खूप वाईट दिसतयं. तिला ना नीट बोलता येत आहे आणि ट्रेलरमध्ये खरेपणा वाटत नाही. हा चित्रपट चांगला असेल अशी आशा करतो, असे असले तरी फक्त अभिनेत्रीला नाही तर झुलन यांना सुद्धा टॅग करायला हवे होते”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल केले आहे.