बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्का तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन स्टाईलमुळे ही चर्चेत असते. अनुष्काचे लाखो चाहते आहेत. अनुष्का आणि विराटच्या लग्नानंतर अनुष्काने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काने वामिकाला जन्म दिला. त्यानंतर अनुष्का वामिका सोबत वेळ घालवताना दिसत आहे. वामिका सोबतच अनुष्का तिचं प्रोडक्शन हाऊस सांभाळतं आहे. एकंदरीत ती वर्किंग वूमन आहे. मात्र, अनुष्काचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अनुष्का उपस्थित होती. यात अनुष्काने लग्नाबद्दल तिला काय वाटते ते सांगितले आहे. “लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे. मला लग्न करायचं आहे, आणि मला माझी मुलं सुद्धा पाहिजे, त्यानंतर मी कदाचित काम करणार नाही,” असं अनुष्का त्या व्हिडीओत बोलताना दिसते. आता अनुष्काच्या सगळ्या चाहत्यांच लक्ष याच कडे लागले आहे. कारण अनुष्का आधी म्हणाली ती काम करणार नाही. मात्र, तिच्या चाहत्यांची इच्छा आहे की असं झालं नाही पाहिजे. अनुष्काने या पुढे ही काम केले पाहिजे.

विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्काने वामिकाला जन्म दिला.

Story img Loader