एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ फ्रेन्चायझीमुळे अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. या फ्रेन्चायझीच्या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने देवसेना हे पात्र साकारले होते. या चित्रपटांसाठी तिने खूप मेहनत घेतली होती. ‘बाहुबली २’ मध्ये तिने साकारलेले पात्र चित्रपटाच्या कथानकासाठी महत्त्वपूर्ण होते. चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी प्रभास आणि अनुष्का एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘बाहुबली’ व्यतिरिक्त अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्या दोघांनी एकत्र काम केले आहे.

अनुष्का शेट्टी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. खूप महत्त्वपूर्ण माहिती जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हाच ती या माध्यमाचा आधार घेताना दिसते. आज तिचा ४१ वा वाढदिवस आहे. तिने या निमित्ताने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटामध्ये ती एका शेफच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे हे पोस्टर पाहून लक्षात येते. तिचा हा नवा अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. चित्रपटाच्या पोस्टरखाली कमेंट करत चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा – धार्मिक भावना दुखावल्याचा वीर दासवर आरोप; नवा कार्यक्रम रद्द करण्याची हिंदू संघटनेची मागणी

“माझ्या वाढदिवशी माझ्या आगामी चित्रपटामधील ‘मास्टरशेफ अन्विथा रावली शेट्टी’ या पात्राची ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे. तुम्हा सर्वांना मोठ्या पडद्यावर भेटायला मी फार उत्सुक आहे”, असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिने नवीन पॉलीशेट्टी आणि महेश बाबू पी यांनीही टॅग केले आहे. या आगामी चित्रपटामध्ये मल्याळम सुपरस्टार नवीन पॉलीशेट्टी तिच्यासह प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर महेश बाबू पी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या नावाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

आणखी वाचा – “मी त्यावेळी दारोदारी फिरत होतो पण…” जितेंद्र जोशीने सांगितला महेश मांजरेकरांचा ‘तो’ किस्सा

‘बाहुबली २’ नंतर २०१८ मध्ये अनुष्काचा ‘भागमथी’ हा ब्लॅकबास्टर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने चिरंजीवी यांच्या ‘सायरा नरसिम्हा रेड्डी’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका साकारली होती. तब्बल चार वर्षांनंतर मुख्य व्यक्तिरेखा असलेला तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader