बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ आणि मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खान पहिल्यांदाच ‘धूम ३’ चित्रपटाद्वारे मोठ्या प़द्यावर एकत्र येत आहेत. ‘धूम ३’ चित्रपटावर आधारीत गेमच्या अनावरण कार्यक्रमाला हे दोघे कलाकार एकत्र आले होते. यावेळी चित्रपटाचा अनुभव सांगताना कतरिना म्हणाली, आमिर खान चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी अत्यंत दक्ष असल्याकारणाने आमिरबरोबर काम करताना प्रथम मी खूप साशंक होते. परंतु, त्याच्याबरोबर काम करायला सुरूवात केल्यावर मी त्याच्या व्यक्तीमत्वाने भारावून गेले. तो एक महान कलाकार असून, सह-कलाकारांना चांगली वागणूक देतो.
कतरिनाने बॉलिवूडमधील तिन्ही खानसोबत काम केले आहे. तिच्या मते प्रत्येक खानचे स्वत:चे असे वैशिष्ट्य आहे. सर्वांच्या नावत खान हा सामाईक दुवा असला तरी, भिन्न-भिन्न प्रकारच्या या अभिनेत्यांची स्वत:ची अशी खास अदाकारी असल्याचे कतरिना म्हणाली.
बॉलिवूडमध्ये एक दशक पूर्ण केलेकी कतरिना या क्षेत्राती स्पर्धेविषयी बोलतांना म्हणाली, मी स्पर्धेला सकारात्मकपणे घेते. बॉलिवूडमधील माझा प्रवास ज्याप्रकारे झाला आहे त्यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजते. मला अपेक्षेपेक्षा अधिक मिळाले आहे. स्पर्धा ही एक चांगली गोष्ट असून, यामुळे तुम्हाला अधिक चांगले काम करण्यास मदत होते. कुठल्याही प्रकारची स्पर्धा ही चांगली असते.
‘धूम ३’ चित्रपट हिरोच्या अवतीभोवती फिरत असल्याने, ओघानेच या चित्रपटात हिरोला महत्व आहे. याविषयी बोलतांना कतरिना म्हणाली, मी याची बिलकून काळजी करत नाही. अता जमाना बदलत चालला आहे. सर्व प्रकारचे चित्रपट स्विकारले जातात, ही एक चांगली गोष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Any competition is good katrina kaif