अभिनेता अपारशक्ती खुराना बॉलिवूडमध्ये त्याच्या हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. नुकताच झी५ वर अपारशक्तीचा ‘हेल्मेट’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात अपारशक्ती हेल्मेट घालून कंडोम विकणाऱ्या तरुणाची भूमिका साकारत आहे. नुकत्याच हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अपारशक्तीने “खरं तर हा सिनेमा म्हणजे माझीच बायोपिक आहे.” असं गमतीत म्हंटलं आहे.

आपरशक्तीने या मुलाखतीत मनसोक्त गप्पा मारत काही खास अनुभव शेअर केले आहेत. अपारशक्तीने यावेळी त्याने पहिल्यांदा कंडोम खरेदी करतानाचा अनुभव शेअर केलाय. तो म्हणाला, ” मी कॉलेजमध्ये असताना कंडोमचं पहिलं पाकिट खरेदी केलं होतं. त्यावेळी बाईकवर डिलेव्हरी बॉय पाकिटं देण्यासाठी येत. ते इतके घाईत असायचे की बऱ्याचदा हेल्मेट न काढताच पाकिटं देऊन निघून जायचे. त्यामुळे मीदेखील तसचं केलं. पटकन माझी बाईक पार्क केली . हेल्मेट न काढताच कंडोम खरेदी केलं आणि लगेचच तिथून निघून गेलो. मला तेव्हा काय कल्पना होती की काही वर्षांनी सिनेमातही मी हेच करणार आहे. फरक फक्त इतकाच की तेव्हा मी कंडोम विकत घेत होतो आणि सिनेमात मी कंडोम विकत आहे.” असं अपारशक्ती म्हणाला.

यावेळी आपरशक्ती मजेत म्हणाला, “ही माझ्या खऱ्या आयुष्याची कथा आहे. ही माझी बायोपिक आहे” असं तो म्हणाला. ‘हेल्मेट’ हा सिनेमा असून यात कंडोमचं महत्व पटवून देण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वीच अपारशक्ती बाबा झाला आहे. आपरशक्तीला मुलगी झाली असून त्याने मुलीचं नाव आरझोई ठेवलं आहे.

Story img Loader