Ram Charan and Upasana Blessed with Baby Girl : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी २० जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या चिरंजीवी यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लग्नाच्या ११ वर्षांनंतर राम व उपासना आई-बाबा झाले आहेत. मुलगी झाल्याचे कळताच राम चरण आणि उपासनावर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : ‘द आर्चीज’चित्रपटाच्या ट्रोलर्सला झोया अख्तरने सुनावले खडेबोल; म्हणाली, “स्टारकिड्सला आधीच नेपोटीजम…”

हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपासनाने मुलीला जन्म दिला. राम चरणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. मुख्य म्हणजे बाळाच्या स्वागतासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये संपूर्ण गुलाबी रंगाची सजावट करण्यात आली आहे.

हेही वाचा : “अजयशी लग्न करणं…” अभिनेत्री काजोलचा लग्नाबाबत मोठा खुलासा, म्हणाली “‘तो’ निर्णय होता सर्वात कठीण”

राम-उपासनाच्या मुलीच्या स्वागतासाठी हॉस्पिटलने का सजावट केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, उपासना ही एका बिझनेस वुमन असून ती अपोलो हॉस्पिटलची उपाध्यक्ष आहे. तसेच उपासना अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष शोबना कामिनेनी यांची मुलगी आहे. त्यामुळेच रुग्णालय प्रशासनाने बाळाच्या स्वागतासाठी खास गुलाबी रंगाची सजावट केली आहे.

हेही वाचा : “‘गदर २’ फ्लॉप होणार” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत; म्हणाला, “कपिल शर्मा चित्रपटांसाठी पनौती…”

राम आणि उपासना यांनी १४ जून २०१२ रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये रामने उपासना लवकरच बाळाला जन्म देणार आहे अशी माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली. आता लग्नाच्या ११ वर्षांनंतर दोघेही एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. राम-उपासनाने ५ दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला.

Story img Loader