बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. एआर रहमान यांची मुलगी खतीजा रहमानचं लग्न झालं आहे. खतीजाने रियासदीन शेख मोहम्मद नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. रियासदीन हा विझकिड ऑडिओ इंजिनियर आणि व्यावसायिक आहे.

खतीजा आणि रियासदीन यांचा लग्नसोहळा हा चेन्नईत पार पडला. एआर रहमान यांनी जावई रियासदीनचे कुटुंबात स्वागत करत असल्याचे म्हणतं सोशल मीडियावर संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “ईश्वर या नव्या जोडप्याला आशीर्वाद देवो, तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद”, असे कॅप्शन एआर रहमानने दिले आहे. एआर रहमानने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : या २ राशीचे लोक असतात खूप भाग्यवान, ‘मंगळ’ ग्रहाच्या कृपेने जीवनात होतात यशस्वी

गेल्या वर्षी खतिजाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गुपचूप रियासदीनशी साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. २९ डिसेंबर रोजी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र या त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

आणखी वाचा : फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ते का होते? मधुमेहाच्या रुग्णांना ‘ही’ माहिती असणे आवश्यक आहे

एआर रहमानच्या पत्नीचे नाव सायरा बानो आहे. त्या दोघांच्या वयात ६ वर्षांचे अंतर आहे. या दाम्पत्याला खतिजा आणि रहीमा या दोन मुली आहेत. एक मुलगा असून त्याचे नाव अमीन रहमान आहे. हिंदू कुटुंबात जन्मलेल्या एआर रहमानचे नाव दिलीप कुमार होते, पण वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.

Story img Loader