संगीताचा बादशहा ए आर रेहमानच्या कॉन्सर्टमधून नाराज होऊन कोणी कसे परतू शकतो आणि ट्विटरवर रेहमानविरोधात इतका राग का व्यक्त केला जातोय असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात रेहमानचे चाहते असून युकेमधील वेम्बली शहरात त्यांनी लाइव्ह कॉन्सर्ट केला आणि हा कॉन्सर्ट संपण्यापूर्वीच हिंदी भाषिक चाहत्यांनी काढता पाय घेतला. रेहमानने फक्त तामिळ भाषेतील गाणी गाऊन इतर भाषिकांना धोका दिल्याचा त्यांचा आरोप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात ट्विटरवर चाहत्यांनी राग व्यक्त केला असून #ssearena आणि #wembley हे हॅशटॅग सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहेत. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याने ती सर्वांवर थोपवू शकत नाही असे तामिळ लोकांचे म्हणणे आहे. दाक्षिणात्य लोकांना हिंदी फारशी बोलता येत नसल्याचा अनेकांचा समज आहे. तर संगीताचे चाहते भाषेबाबत इतके पक्षपाती कसे असू शकतात असे तामिळ भाषिकांचे त्यांचे मत आहे.

https://twitter.com/Abhinandan248/status/885338994891833344

काही चाहत्यांनी तर आयोजकांकडे पैसे परत करण्याची मागणी केलीये. सोशल मीडियावर तामिळ भाषिक आणि हिंदी भाषिक रेहमानच्या चाहत्यांमध्ये ‘ट्विटर युद्ध’ सुरू झाले. तामिळ भाषिकांचे म्हणणे आहे की शोचे नाव ‘नेत्रु, इंद्रु, नलाई’ असे होते. हिंदीमध्ये त्याचा अर्थ ‘काल, आज आणि उद्या’ असा होतो. जर कोणाला तामिळ भाषा समजत नसेल आणि त्यांना या भाषेतील गाणी ऐकायची नव्हती तर त्यांनी शोचे नाव वाचूनच तिथे जायला पाहिजे नव्हते, असे रेहमानच्या तामिळ भाषिक चाहत्यांचे मत आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंदी भाषिक चाहत्यांच्या मते रेहमान हे हिंदुस्तानी कलाकार आहेत म्हणून त्यांनी बॉलिवूडचीसुद्धा काही गाणी गायला हवी होती.

https://twitter.com/archana_ssawant/status/883823729964445703

वाचा : …या एका चुकीमुळे विवेकने ऐश्वर्याला गमावलं

हे भाषिक युद्ध बाजूला ठेवल्यास केवळ ए आर रेहमानचे चाहतेच नाही तर संगीताच्या चाहत्यांसाठी भाषेचे बंधन नसावे असे अनेकांना वाटते. त्यामुळे रेहमानने ‘दिल से रे’ गायले किंवा ‘कन्निरे’ गायले तरी त्यांचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. अखेर एक चांगले संगीत आणि गाण्याचे उत्तम बोल कोणत्याही भाषेचे बांधिल नसतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

https://twitter.com/gautamvaidya/status/883836083070521344

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ar rahman disappointed fans walked out from his concert in uk