राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने काही दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता या गाण्याला ऑस्करमध्येही नामांकन मिळालं आहे. गोल्डन ग्लोब व क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकणारं हे गाणं यंदा भारताला ऑस्कर मिळवून देईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. अशातच या गाण्याला नामांकन मिळाल्यानंतर ऑस्करविजेते संगीतकार एआर रेहमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या वादावर ए आर रेहमान यांचं परखड मत; दिग्दर्शकाची बाजू घेत म्हणाले…
दोन वेळा अकादमी पुरस्कार विजेते ए.आर. रहमान यांनी ऑस्कर नामांकन मिळवल्याबद्दल एमएम कीरावानी आणि ‘नाटू नाटू’ गाण्याशी संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या. “इथंपर्यंत पोहोचणं सोपं नाही, त्यांनी जबरदस्त काम केले आहे. ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. तेलुगू व भारतीय तालावर नाचण्याबद्दल लोक दिलगिरी बाळगत नाहीत. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हे पुन्हा पुन्हा व्हायला हवं. जेव्हा आपण लीडर बनू, ते खूपच आश्चर्यकारक असेल. एमएम कीरावानी हे अंडररेटेड संगीतकार आहेत. मी माझ्या मुलांना सांगतो की ते ३५ वर्षांपासून काम करत आहेत आणि त्यांना हे काम सोडायचं आहे. पण, त्यांचं खरं करिअर आता सुरू झालंय, ‘नाटू नाटू’ने ऑस्कर पुरस्कार जिंकावा, अशी माझी इच्छा आहे,” असं एआर रेहमान यांनी न्यूज १८ ला सांगितले.
“केवळ बॉलिवूडच नव्हे, तर…” पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रवीना टंडनने मानले केंद्र सरकारचे आभार
राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. याशिवाय चित्रपटाने जागतिक स्तरावरही भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर, आलिया भट्ट, श्रिया सरण, अजय देवगण हे सहायक भूमिकेत दिसले होते.