गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये मलायका आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाविषयी सुरू असलेल्या चर्चेमुळे अरबाझ खान चांगलाच भडकला आहे. त्याने ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला असून मलायकाच्या आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी मी बांधील नसल्याचे सांगितले आहे. आमची इन्स्टाग्रामवरील छायाचित्रे आणि वैवाहिक नात्याविषयी वायफळ तर्कवितर्क आणि चर्चा करणे थांबवा. आमच्या नात्याबद्दल चर्चा करायला तो काही चित्रपट नाही, असेही अरबाझने म्हटले आहे. या दोघांमध्ये सध्या बरेच ताणतणाव असून ते विभक्त होणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी स्पॉटबॉय डॉट कॉमने दिले होते.

१७ वर्षाच्या एकत्र सहवासानंतर ते पहिल्यांदाच वेगळे रहात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलायकाने अरबाझच्या वांद्र्यातील घराला राम राम ठोकला असून तिने आपल्या खारमधील घरात राहायला सुरुवात केली आहे. अरबाझ आणि मलायका हे दोघेही ‘पॉवर कपल’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत होते, मात्र ब-याच दिवसांपासून मलायका या शोमध्ये दिसलेली नाही. तसेच अरबाजची बहीण अर्पिता हिच्या दुबईतील ‘बेबी शॉवर’साठीही ती उपस्थित नव्हती.

Story img Loader