बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. ते एकत्र फिरताना आणि डिनर डेटला जाताना दिसतात. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. आता जॉर्जियाचा समुद्र किनाऱ्यावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती हॉट दिसत आहे.

जॉर्जियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ गोव्यामधील एका समुद्र किनाऱ्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये जॉर्जियाने मोनोकिनी परिधान केली असून ती अतिशय हॉट दिसत आहे. तसेच ती टोनी कक्करचे अतिशय लोकप्रिय गाणे ‘गोवा वाले बीच पे’ या गाण्यावर मजामस्ती करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

आणखी वाचा : ‘आर्यनने मुलींना डेट करावे, सेक्स करावा, ड्रग्ज घ्यावेत’, शाहरुख खानचे वक्तव्य पुन्हा चर्चेत

अरबाज खानने २०१९मध्ये एका मुलाखतीमध्ये जॉर्जियाला डेट करत असल्याचे मान्य केले होते. जॉर्जियाने ‘Karoline Kamakshi’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या सीरिजमध्ये काम करत तिने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने मिका सिंगसोबत ‘तेरा मस्ताना’मध्ये काम केले आहे. ती लवकरच ‘वेलकम टू बजरंगपुर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे देखील दिसणार आहे.