छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’मध्ये अभिनेत्री अर्चना पुराण सिंह दिसत आहेत. अर्चना आणि कपिल शर्मा यांच्यामधील संवाद पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडता. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्चना यांनी मुलाच्या कानशिलात लगावली आहे.

अर्चना यांचा मुलगा आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई अर्चनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्चना ड्रेसिंग मिररसमोर उभ्या असल्याचे दिसत आहे. दरम्यान त्या केस कापताना दिसत आहेत. त्यांचा मुलगा आयुष्मानने नकळत व्हिडीओ शूट केला. आयुष्मान व्हिडीओ शूट करत आहे हे कळताच अर्चना यांना प्रचंड राग येतो आणि त्या आयुष्मानच्या कानशिलात लगावतात.

आयुष्मानने हा व्हिडीओ शेअर करत ‘आईने कानशिलात लगावली… आईला त्रास देण्यापेक्षा दुसरे काय मजेशीर काम असू शकते?’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.

Story img Loader