गेले काही दिवस बॉलीवूडकरांकडून गोड बातम्या ऐकू येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहिदची पत्नी मीरा राजपूत ही गरोदर असल्याचे कळले. त्यानंतर आता भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्याशी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री गीता बसरा हीदेखील गोड बातमी देणार असल्याचे कळले.
पिंकविला या संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे आयपीएलच्या उद्घाटन  सोहळ्यासाठी आले होते. तेव्हा त्या दोघांच्याही चेह-यावर एक वेगळीच चमक दिसून येत होती. त्यांच्या चेह-यावरचा आनंद आणि उत्साह पाहता नक्कीच त्यांच्याकडे गोड बातमी असल्याचे पिंकविलाने म्हटलेय.
गीता आणि भज्जी यांचे लग्न जालंधर येथे झाले होते. दिल्ली येथे झालेल्या त्यांच्या लग्नाच्या रिसेप्नशला माजी पंतप्रधानांपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती.

Story img Loader