‘किक’ चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमादरम्यान जॅकलीन फर्नांडिस आणि सलमान खान यांच्यात वाढलेल्या जवळकीमुळे चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तपत्रातील बातमीनुसार दोघांमधली जवळीक अद्याप कायम असून, या जोडीमध्ये मैत्रीच्यापलीकडे काहीतरी असण्याची शक्यता वर्तवली आहे. पहाटेच्या वेळी सलमानला जॅकलीनसोबत जवळच्या मित्राच्या घरी जाताना पाहण्यात आल्याचेदेखील समजते. ‘किक’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एकमेकांच्या जवळ आलेले हे दोघे चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमातदेखील एकमेकांबरोबर अतिशय सहजतेने वावरताना दृष्टीस पडत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी कॅमेऱ्याची पर्वा न करता ही जोडी एकमेकांबरोबर हास्यमस्करी करताना नजरेस पडली. सलमानच्या गालावर चुंबन देणाऱ्या जॅकलिनला छायाचित्रकारांनी कॅमेराबध्द केले. जॅकलिन ही पहिली अभिनेत्री आहे जिला मोठ्या पडद्यावर किस करायला आपल्याला आवडेल, या सलमानच्या विधानाने खळबळ माजवली होती.

लव्हर बॉय सलमानच्या आयुष्यात यापूर्वी संगिता बिजलानी, सोमी अली, माजी विश्वसुंदरी एश्वर्या राय, स्नेहा उल्लाल, कतरिना कैफ, जर्मन मॉडेल क्लॉडिया सिसला, झरिना खान, महेक चहेल, हझेल किच आणि आलिकडच्या काळातील रोमानियन अभिनेत्री लुलीआ व्हंटुर अशा अनेक स्त्रिया येऊन गेल्या.
‘हाऊस फुल’ चित्रपटाच्या सेटवर साजिद खान आणि जॅकलिन यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. तीन वर्ष एकत्र असलेल्या या जोडीने नंतर एकमेकांपासून फारकत घेतली. सलमान आणि जॅकलीन या जोडीचा हॅपी एण्डिंग व्हावा अशी अपेक्षा सलमानच्या चाहत्यांकडून व्यक्त होत असल्यास, यात वावगे ते काय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा