‘मसान’, ‘संजू’ आणि आता ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार कामगिरी करणारा अभिनेता विकी कौशल लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. चित्रपटांसोबतच विकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. ही चर्चा होण्यामागचं कारणही तसंच आहे. टीव्ही अभिनेत्री हरलीन सेठी हिच्यासोबतच्या एका फोटोमुळे विकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या फोटोमुळे विकी आणि हरलीनच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचंही म्हटलं जात आहे.
विकीची मुख्य भूमिका असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक-समीक्षकांकडून त्याला पसंती मिळत आहे. विकीने या चित्रपटाचं यश हरलीनसोबत साजरा केला असून तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. विकीसोबतच्या या फोटोमुळे दोघांनीही आता अधिकृतरित्या त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
https://www.instagram.com/p/BsuaSGthXME/
गेल्या काही महिन्यांपासून विकी आणि हरलीन एकमेकांना डेट करत आहे. दिग्दर्शक आनंद तिवारीच्या माध्यमातून विकी आणि हरलीनची भेट झाली. या दोघांना एकत्र लंच डेटला जातानाचे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. विकीने ‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. तेव्हासुद्धा त्याने एकीला डेट करत असल्याचं मान्य केलं पण तिचं नाव त्याने सांगितलं नव्हतं.
https://www.instagram.com/p/BshpKmfhiGW/
Video : राखी सावंतच्या कथित प्रियकराला भररस्त्यात मारहाण
‘उरी’च्या टीमने नुकताच चित्रपटाचा यश साजरा केला. या पार्टीत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘How’s The Josh’ लिहिलेला स्वेटशर्ट परिधान केला होता. विकीसोबतच्या या फोटोमध्ये हरलीननेही असाच स्वेटशर्ट घातल्याचं पाहायला मिळत आहे.
डान्सर म्हणून हरलीनने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर काही काळ तिने ‘एनडीटीव्ही गुड टाइम्स’ या वाहिनीसोबत काम केलं. २०१३ मध्ये तिला अभिनेत्री म्हणून पहिली संधी मिळाली. ‘पिअर्स’ आणि ‘ब्लू स्टार’ यांसारख्या जाहिरातींमध्येही ती झळकली आहे.