अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. सलमान खान हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. सलमान खानच्या लग्नावरुन आतापर्यंत अनेक चर्चा रंगल्या आहेत. सलमान खान कधी लग्न करणार? हा जणू काही जागतिक प्रश्नच झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमानने सोनाक्षी सिन्हाशी लग्न केल्याचे दिसत आहे. अनेकांना हा फोटो पाहून सोनाक्षी आणि सलमानने गुपचूप लग्न केले का? असा प्रश्न पडला आहे. मात्र नुकतंच सोनाक्षीने मौन सोडत यावर स्पष्टीकरण दिले आहे.
सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा हे दोघेही फारच चर्चेत आहे. यात चर्चेत असणाऱ्या फोटोमध्ये सलमान खान हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला अंगठी घालताना दिसत आहे. यातील एका फोटोत सलमानने ब्लेझर घातले आहे तर सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली आहे. सोनाक्षी या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोवरुन सलमान आणि सोनाक्षीने गुपचुप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान हे सर्व फोटो व्हायरल झाल्यानंतर नुकतंच सोनाक्षी सिन्हाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “तुम्ही इतके मूर्ख आहात का, की तुम्हाला खरा आणि एडिट केलेला फोटो यातील फरक समजत नाही”, असे सोनाक्षी म्हणाली. तर दुसरीकडे या फोटोवर सलमानने काहीही उत्तर दिलेले नाही.
सलमान आणि सोनाक्षीचा व्हायरल होणारा हा फोटो फोटोशॉपमध्ये एडिट केलेला आहे. त्यांचा हा फोटो दबंग या चित्रपटातील आहे. यात सोनाक्षीने सलमानच्या पत्नीची भूमिका साकरली होती. त्यामुळे सोनाक्षी आणि सलमानचा हा फोटो खोटा आणि एडिट केलेला आहे.
अजय देवगण नव्हे तर ‘हा’ अभिनेता होता काजोलची पहिली पसंती, एक झलक पाहण्यासाठी असायची उत्सुक
सलमान आणि सोनाक्षीमध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे. सोनाक्षीने सलमानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता.