बॉलिवूड क्षेत्रातून आणखी एक निराशाजनक बातमी येतेय. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती बिघडली आहे. अचानक प्रकृती बिघड्यानंतर त्यांना कोलकत्ता इथल्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय. गायक अरिजीत सिंहच्या आईसाठी रक्ताची गरज असल्यानं सोशल मीडियावरून मदत मागितली. आहे.

‘दिल बेचारा’ आणि ‘पाताललोक’ फेम बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिलीय. या पोस्टमध्ये तिनं ‘अर्जंट एसओएस’ अशी कॅप्शन लिहिलीय. तिने लिहिलं की, ” A निगेटिव्ह रक्ताची गरज आहे…अरिजीत सिंहची आई अर्मी डकूरिया रूग्णालयात उपचार घेत आहेत…आजच्या आजच A निगेटिव्ह रक्ताची गरज आहे…जे कोणी रक्तदाते इच्छूक असतील त्यांनी स्वातीसोबत संपर्क करावा.” तसंच रक्तदाता हा पुरूषच हवा असं देखील तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

यासोबतच दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी ट्विटरवर बंगाली भाषेत ट्विट करून अरिजीतच्या आईसाठी मदतीचं आवाहन केलंय. यात अभिनेत्री स्वस्तिकाने मदतीसाठी जो नंबर शेअर केला तो नंबर देखील दिग्दर्शक श्रीजीत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये शेअर केलाय.

मात्र, गायक अरिजीत सिंहच्या आईला कशासाठी रूग्णालयात दाखल केलंय आणि काय त्रास होतोय, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूडचा ‘रोमॅंण्टिक सिंगर’ अरिजीत सिंहने २००५ पासून त्याच्या करियरला सुरवात केली. सिंगिंग रिअॅलिटी शो ‘फेम गुरूकुल’ मध्ये त्याने भाग घेतला होता. त्यानंतर गायक अरिजीत सिंहला ‘तुम ही हो’ या गाजलेल्या गाण्यातून प्रसिद्धी मिळण्यास सुरवात झाली. यापूर्वी त्याने मोठ्या प्रमाणात संघर्ष केला आहे. या गाण्यापासून गायक अरिजीत सिंह कायम यशाच्या शिखरावरच टिकून राहीला.

Story img Loader