‘क्यों की तुम ही हो…, मेरी आशिकी’,
‘मुस्कुराने की वजह तुम हो’,
‘में रंग शरबतों का’,
‘कभी जो बदल बरसे’…
एकाचवेळी रोमँटीक, जोषपूर्ण गाण्यांसोबतच सुफी लहेजाचा आविष्कार करीत आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज… अरिजित सिंग.
‘आशिकी २’ च्या यशाला अरिजित सिंगने एक वेगळी उंची गाठून दिली. छोट्या-मोठ्यांच्याही ओठांवर रुळणाऱ्या या गाण्यांनी अरिजित सिंगची मोहिनी सर्वच वयोगटांत पसरवली आहे. ही स्वरमयी जादू आपल्याला लवकरच मराठीतही अनुभवता येणार आहे. जिगवी प्रोडक्शन प्रस्तुत ‘येस आय कॅन’ या मराठी चित्रपटाद्वारे अरिजित सिंगचा आवाज मराठीतही ऐकायला मिळणार आहे. ‘पावलांना मार्ग कळे ना…’ या अक्षय खोत यांनी लिहिलेल्या गीताला अरिजित सिंगने आपल्या मधाळ आवाजाने चारचाँद लावलेत. नुकतेच या गीताचे ध्वनिमुद्रण पार पडलं.
अमित शाह यांच्या कथेवर आधारलेला ‘येस आय कॅन’ हा चित्रपट वडील आणि मुलाचे नातेसंबंध अधोरेखित करतो. दिग्दर्शिका संगीता राव आणि अभिजीत गाडगीळ या द्वयींनी मिळून पटकथा लिहिली असून संवाद अभिजीत गाडगीळ यांचे आहेत. ‘येस आय कॅन’ चे छायांकन नरेन गेडीया यांचे आहे. अक्षय खोत यांच्या गीत-संगीताने सजलेला ‘येस आय कॅन’ हा नक्कीच विशेष ठरेल.
‘येस आय कॅन’ चित्रपटात राजेश शृंगारपुरे, नीना कुलकर्णी, मिहीर सोनी, मृणाल ठाकुर, परेश गणात्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘येस आय कॅन’ लवकरच चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.
मराठीत गुंजणार अरिजित सिंगचा आवाज!
एकाचवेळी रोमँटीक, जोषपूर्ण गाण्यांसोबतच सुफी लहेजाचा आविष्कार करीत आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज...
First published on: 04-05-2015 at 01:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arijit singh will sing a song for marathi movie