राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढण्यास सुरूवात झाल्याचे दिसत आहे. सामान्यांपासून ते अनेक दिग्गजांपर्यंत अनेकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. अशातच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीला ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुनची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले आहे. सध्या अर्जुनने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अर्जुनने काही प्लॅन केले होते. पण ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यामुळे त्याला सर्व प्लॅन रद्द करावे आले आहेत. अर्जुनने त्याच्या आईची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे देखील सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘जॉनसोबत तो रोमँटिक सीन शूट करताना पती समोर…’, अभिनेत्रीने सांगितला अनुभव

ओमायक्रॉन विषयी बोलताना अर्जुन म्हणाला की, मी लोकांना सांगू इच्छितो की हा नवा व्हायरस ओमायक्रॉन घातक नाही. कारण सध्या मी त्याचा सामना करत आहे. मी दोन ते तिन दिवसांमध्ये ठिक झालो. मला नाही वाटत या व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. घाबरण्याचेही कारण नाही. पण हा व्हायरस झपाट्याने पसत आहे त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायला हवी.

काल दिवसभरात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही ५ हजारांच्याही पुढे असल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर दुसरीकडे ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. दिवसभरात राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर १९८ नवीन ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय, २२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर आली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun bijlani tested positive for omicron and his mother also found covid 19 avb