स्वत:च्या आईला गमावल्यानंतरचा काळ हा सर्व मुलांसाठी अतिशय खडतर आणि कठीण असतो. सात वर्षांपूर्वी २०१२ मध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची आई आणि बोनी कपूरची पहिली पत्नी मोना कपूरचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी अर्जुन कपूर २६ वर्षांचा होता तसेच त्याने बॉलिवूडमध्येदेखील पदार्पण केले नव्हते. मुलाखती किंवा टॉक शो दरम्यान अर्जुन आईला गमावल्याबद्दल दुख: व्यक्त करतो आणि प्रत्येक वेळी ते ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन कपूरने आई मोना कपूरच्या पुण्यतिथीनिमीत्त इन्स्टाग्राम खात्यावर लहानपणीचा फोटो शेअर करत एक नोटही लिहिली आहे. ‘तू माझे हस्य होतीस आणि तू जिथे कुठे असशील तिथे मी तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणेन. तू आम्हाला ७ वर्षांपूर्वी सोडून गेलीस आणि तुझा हा मुलगा तुला परत बोलावत आहे’ अशी हृदयस्पर्शी नोट अर्जुनने लिहिली आहे. ती वाचतात चाहत्यांचे मन भरुन आले आहे.

मीडियासोबतच्या संभाषणात बऱ्याच वेळा अर्जुन आईबद्दल बोलताना दिसतो. तसेच बोनी कपूरची दुसरी पत्नी श्रीदेवीचे निधन झाले तेव्हा अर्जुन आणि अंशुलाने खंबीरपणे जान्हवी आणि खुशी कपूरला आधार दिला होता.

अर्जुन कपूरची छोटी बहिण अंशुला हिने देखील इन्स्टाग्रामवर आईसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘वेळ काही बदलत नाही. मला दररोज तुझी आठवण येते. गेल्या सात वर्षांपासून तुझे हसणे, प्रेमाने माझा हात पकडणे या गोष्टीची मला फार आठवण येते’ असे त्यात तिने लिहिले होते.