अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात होत आहे. या चर्चांमागचं कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. मलायकाने तिचा वाढदिवससुद्धा अर्जुनसोबत साजरा केला. इतकंच नव्हे तर पार्ट्यांमध्येही ही दोघं बिनधास्त एकत्र वावरू लागली. त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा होत असतानाच आता या दोघांनी एकत्र नवीन घर घेतल्याचं समजतंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मलायका आणि अर्जुनने मिळून मुंबईतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेतला आहे. दोघांनी एकत्र गुंतवणूक करत हा फ्लॅट विकत घेतल्याचं कळतंय. सध्या त्याच्या इंटिरिअरचं काम सुरू आहे. अर्जुन- मलायका लिव्ह- इनमध्ये राहणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.

वाचा : ‘तुला पाहते रे’ मालिकेत लवकरच होणार विक्रांत सरंजामेच्या पत्नीची एण्ट्री

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अर्जुनने सिंगल नसल्याचं कबुल केलं. त्याचप्रमाणे मी आता लग्नासाठी तयार आहे असंही त्याने सांगितलं. त्यामुळे अर्जुन लवकरच मलायकासोबत लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

अरबाज- मलायका हे दोघंही वर्षभरापूर्वी विभक्त झाले. त्यानंतर अरबाजनं प्रेयसी जॉर्जिया एण्ड्रीयानी सोबत नव्या आयुष्याला सुरूवात केली. जॉर्जिया आणि अरबाज दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे अर्जुनसोबत आता मलायकानं नवीन आयुष्याला सुरूवात करण्याचं ठरवलं आहे. मलायका ४५ वर्षांची आहे तर अर्जुन ३३ वर्षांचा आहे.