बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा काल २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. मलायकाच्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरने देखील तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. मात्र, अर्जुनची ती पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अर्जुनला ट्रोल केले आहे.

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मलायका अर्जुनला किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत अर्जुनने मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, नेटकऱ्यांनी मलायकाच्या वयावरून त्याला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर विनोद केले आहेत.

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अर्जुन आणि मलायकाला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “दादा तुला याहून चांगली मुलगी भेटली असती, पण तुला आंटी भेटली.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मुलगा आणि आजी.” तिसरा नेटकरी म्हणाला, “तिचा दुसरा मुलगा कुठे आहे?” आणखी एक नेटकरी म्हणाला, “याला म्हणतात आई आणि मुलात असलेलं प्रेम,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अर्जुनला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : तुरुंगाता आर्यन खानला प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या पुस्तकांचा आधार

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार

अर्जुन आणि मलायका बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे बऱ्याच वेळा एकत्र डिनर किंवा फिरायला जाताना दिसतात. दरम्यान, अर्जुन हा ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसला होता.

Story img Loader