मलायका आणि अरबाज विभक्त होऊन आता बरेच महिने लोटले. एकीकडे अरबाजनं त्याच्या नव्या प्रेयसीसोबत नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे तर दुसरीकडे मलायका मात्र जपून पावलं उचलत आहे. मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा वर्षभरापासून होत्या पण, दोघांनीही आपलं नातं सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणत या दोघांनीही आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगायला सुरूवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका फॅशन शोमध्ये पहिल्यांदा मलायका – अर्जुन एकत्र दिसले. त्यानंतर या जोडप्याला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. आता हे कथित जोडपं पुन्हा एकदा ‘इंडियाज गॉट टॅलेन्ट’च्या रंगमंचावर पाहायला मिळालं. यावेळी मलायकाचा हात हातात घेत अर्जुन मंचावर आला. अर्जुन आपल्या ‘नमस्ते इंग्लड’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘इंडियाज गॉट टॅलेन्ट’मध्ये आला होता. मलायका या शोची परीक्षकदेखील आहे. अर्जून चित्रपटाची मुख्य अभिनेत्री परिणिती चोप्रासोबत आला होता. मात्र परिणितीसोबत न बसता मलायकाच्या बाजूला बसणं अर्जुननं पसंत केलं. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज विभक्त झाले त्यानंतर काहिच महिन्यात मलायकाचं नाव अर्जुनसोबत जोडलं गेलं.