बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असतो. अर्जुन आणि मलायका अरोराची जोडी ही बॉलिवूडमधील मोस्ट रोमॅंटिक जोडी म्हणून देखील ओळखली जाते. आता अर्जुनने मलायका जवळच एका सोसायटीत नवीन घर घेतले आहे.

अर्जुन कपूरने मुंबईतील वांद्रे परिसरातील ज्या ठिकाणी मलायका राहते त्याचं ठिकाणी घर घेतलं आहे. २५व्या मजल्यावर अर्जुनने एक स्कायव्हिला बुक केला असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्जुन कपूरच्या या घराची किंमत २० कोटी रूपये असल्याचं म्हटलं जातं आहे. त्याचा हा फ्लॅट ४ बीएचके आहे. पण याबद्दल अर्जुनने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

अर्जुनच्या व्हिलामध्ये पूल, जीम, पेट कॉर्नर, लायब्ररी, प्ले एरिया, मिनी गोल्‍फ कोर्स, स्पा सारख्या अनेक सुविधा आहेत. दरम्यान, अर्जुन आता ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटांमध्ये दिसला. यानंतर ‘भूत पोलिस’ आणि ‘एक विलेन २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Story img Loader