बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूरची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकताच अर्जुनने त्याचा ३७ वा वाढदिवस मलायकासोबत पॅरिसमध्ये साजरा केला. अर्जुनच्या वाढदिवसाच्या काही दिवस ते दोघे पॅरिसला गेले होते. मलायका आणि अर्जुन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी मलायकासोबत एक फोटो शेअर करत अर्जुनने तिला चोर म्हटले आहे.
आणखी वाचा : “हे सगळं देवाच्या नावावर…”, उदयपूर हत्या प्रकरणावर कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने सकाळी निळ्या रंगाचं हूडी परिधान केलं आहे. तर रात्री तेच हूडी मलायकाने परिधान केलं आहे. हे फोटो शेअर करत अर्जुन म्हणाला, “सकाळी त्याचं असतं आणि संध्याकाळी तिचं होतं.” याशिवाय अर्जुनने त्याच्या स्टोरीवरून मलायकासोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “कॅप्शन चोर, फोटो चोर आणि हूडी चोर…”, असे कॅप्शन त्याने दिले आहे.
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
पाहा पोस्ट
आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
पाहा फोटो
आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर
अर्जुन कपूर शेवटी सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससोबत ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. अर्जुन लवकरच जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारियासोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २९ जुलै २०२२ रोजी रिलीज होणार आहे.