बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतो. अर्जुनच्या ‘सरदार का ग्रँडसन’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटादरम्यान, अर्जुनने त्याच्या आजीच्या इच्छे बद्दल सांगितले. त्यांची इच्छा तो पूर्ण करु शकत नाही असं तो एका मुलाखतीत म्हणाला आहे.

अर्जुनने नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अर्जुनने त्याच्या आजीच्या इच्छेबद्दल सांगितले आहे. “माझ्या आजीची इच्छा पूर्ण करणे खूप अवघड आहे कारण तिला नातवंड हवी आहेत आणि ते मी अस करु शकत नाही, आता ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व विवाहित कपूर खानदानवर पूर्णपणे अवलंबून आहोत,” असं अर्जुन म्हणाला.

आणखी वाचा : ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी

पुढे अर्जुनने त्याची आई मोना कपूरबद्दल सांगितले. “माझी आई जाण्यापूर्वी माझं आईशी बोलणं झालं होतं. त्यावेळी, मी आणि अंशुला आमचं वेगवेगळ व्यक्तिमत्त्व असावं अशी तिची इच्छा होती. आम्ही माणूस म्हणून काय काम करतो, किंवा अपयशाबद्दल नाही तर फक्त एक माणूस म्हणून, आणि मी नेहमीच आईला सांगितले आहे की हे मी नेहमीच सुनिश्चित करेन की अंशुला आणि मी माझ्या आईने दिलेल्या सगळ्या मुल्यांचे प्रतिनिधित्व करु. मला वाटतं की ही एक प्रक्रिया आहे जी कधी संपणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

‘सरदार का ग्रॅंडसन’ या चित्रपटात अर्जुन सोबत मुख्य भूमिकेत रकुन प्रीत सिंह, जॉन अब्राहम, नीना गुप्ता आणि आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १८ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader