करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या भागात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याची चुलत बहीण सोनम कपूर यांनी हजेरी लावली. हा एपिसोडचा प्रदर्शित झाली आहे. या भागात अर्जुन त्याच्या करणशी आयुष्याबद्दल, कामाबद्दल आणि काही लोकांबद्दल गप्पा मारताना दिसला. करणने अर्जुन कपूरला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. यातील बहुतेक प्रश्न त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराशी संबंधित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – VIDEO: “ये भारत का तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”; न्यूयॉर्कमध्ये अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं

करण अर्जुनला त्याचं नातं सार्वजनिक करण्याबद्दल प्रश्न करताना दिसला. याशिवाय करणने विचारले की, तुमच्या नात्याबद्दल आता सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तू आता मलायकासोबत लग्न करण्याचा विचार करत आहेस का? यावर अर्जुनने सध्या लग्नाचा विचार करत नसल्याचं सांगितलं. “मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. करोना आणि लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. पण आता मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे,” असं अर्जुन म्हणाला.

हेही वाचा – रिअॅलिटी शोमध्ये रडण्यावरून ट्रोल होणारी नेहा कक्कर म्हणाली, “शो मजेदार बनवण्यासाठी…”

अर्जुन पुढे म्हणाला, “मी खूप स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही. मी थोडा लाजाळू आहे. मला प्रोफेशनली अजून थोडं स्थिर व्हायचं आहे. मी आर्थिकदृष्ट्या नाही तर भावनिकदृष्ट्या बोलत आहे. मला ते काम करायचंय जे मला आनंद देईल. कारण जर मी आनंदी असेल तर मी माझ्या पार्टनरला आनंदी ठेवू शकेन. शिवाय मी माझे जीवन आनंदाने जगू शकेन. त्यामुळे मला वाटते की काम केल्याने मला खूप आनंद मिळतो.”

हेही वाचा – शैलेश लोढांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार तारक मेहतांची भूमिका?

या एपिसोडमध्ये अर्जुनने मलायका अरोरा त्याच्या आजीला भेटल्याचे सांगितले. याशिवाय अर्जुनने घरच्यांना नात्याबद्दल सांगायला इतका वेळ का लागला, हेही सांगितले. तसेच “मी माझ्या कुटुबांबद्दल, मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान, त्याचे कुटुंब आणि जवळच्या लोकांबद्दल संवेदनशील आहे, त्यामुळे मला या नात्याबद्दल सर्वांना सांगायला वेळ लागला,” असं अर्जुनने सांगितलं.