बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अर्जुन त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरामुळे चर्चेत असतो. अर्जुनने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर नेटकऱ्यांनी त्याला मलायका विषयी अनेक प्रश्न विचारले आहेत. अर्जुनने मलायका नाही तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचा एक टॅट्यू काढला आहे.

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुनने त्याचा टॅट्यू दाखवला आहे. त्याच्या या टॅट्यू मध्ये ‘A’ हे अक्षर आहे. त्याच बरोबर स्पॅडचे चिन्ह ही आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘मी आणि अंशुला आयुष्यभरासाठी एकमेकांमध्ये गुंतलेले आहोत आणि A या अक्षरामध्ये सुद्धा,’ अशा आशयाचे कॅप्शन अर्जुनने दिले आहेत. अर्जुनचा टॅट्यू पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. कारण त्याने त्याच्या बहिणीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा टॅट्यू काढला आहे. तर काहींनी त्याला मलायकाचा टॅट्यू का नाही काढला असा प्रश्न देखील विचारला आहे.

आणखी वाचा : नाइलाज म्हणून शर्टाला बांधली गाठ, चाहत्यांनी फॅशन समजून केली कॉपी

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

अर्जुनचा ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सरदार का ग्रॅंडसन’ हे चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय अर्जुन, ‘एक व्हिलन २’ आणि ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘एक व्हिलन २’ हा मल्टीस्टारर चित्रपट असून यामध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत.

Story img Loader