मला एखाद्या चित्रपटात रोमँटिक भूमिकेत काम करताना माझ्या आईला बघायचे होते असे ‘टु स्टेटस’ या चित्रपटाचा नायक अर्जून कपूरने सांगितले.  अर्जूनची आई मोना कपूर यांचे दोन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे निधन झाले. ‘टु स्टेटस’ या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या आईची इच्छा पूर्ण झाली असून हा क्षण आपल्यासाठी अतिशय भावनिक असल्याचे अर्जूनने सांगितले. ‘टु स्टेटस’ प्रदर्शित होण्याच्या बरोबर दोन वर्षांपूर्वी माझी आई चेतन भगतची ‘टु स्टेटस’ ही कादंबरी वाचत असल्याची आठवण अर्जून कपूरने सांगितली. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना माझ्याबरोबर अशाप्रकारच्या आठवणींचा ठेवा होता असे अर्जूनने सांगितले.

Story img Loader