बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या ‘एक विलन रिटर्न्स’मुळे चर्चेत आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पाटनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त अर्जुन कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत असला तरीही काही वर्षांपूर्वी मात्र तो सलमान खानची धाकटी बहीण अर्पिला खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण नंतर काही कारणाने दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. ब्रेकअपनंतर काही वर्षांनी अर्जुननं यावर स्पष्टीकरण दिलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता, “माझं सर्वात पहिलं आणि सिरीयस रिलेशनशिप अर्पिता खानसोबत होतं. जेव्हा मी १८ वर्षांचा होतो तेव्हा तिला डेट करायला सुरुवात केली होती. आम्ही दोघं २ वर्षं एकमेकांसोबत होतो. पण त्याआधीपासून मी सलमान खानला ओळखत होतो. ‘मैंने प्यार क्यों किया?’ या चित्रपटाच्या दरम्यान आमच्या नात्याची सुरुवात झाली होती. पण मी सलमान खानला खूप घाबरलो होतो. त्यामुळे मी जाऊन त्याला आणि संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट सांगितली. त्यांनी मला व्यवस्थित जाणून घ्यावं असं मला वाटत होतं. पण सलमान याबाबतीत खूपच दयाळू आहे. त्याला सुरुवातीला धक्का बसला पण तो माणसं आणि नात्यांचा आदर करतो. त्या नात्यात सलमानने नेहमीच माझी बाजू घेतली होती.”

आणखी वाचा- “…तर मग परिणाम भोगावेच लागणार” मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरचं वक्तव्य

अर्जुन कपूर पुढे म्हणाला, “काही काळानंतर अर्पितानं ब्रेकअप केलं. त्यावेळी माझं वजन १४० किलो होतं. मी निखिल आडवाणीला ‘सलाम-ए-इश्क’साठी असिस्ट करत होतो. एक गर्लफ्रेंड होती. आम्ही पार्टी करायचो आणि मी असा विचार करत होतो की माझं आयुष्य योग्य दिशेने जात आहे. मी निश्चिंत होतो आणि वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत मी चित्रपट दिग्दर्शन करेन असा विचार करत होतो. पण तिने ब्रेकअप केलं आणि मी माझ्या भविष्याबाबत गोंधळून गेलो होतो. पुढे काय करायचं हे मला समजत नव्हतं.”

अर्पिता खानशी ब्रेकअपनंतरही अर्जुन कपूर आणि सलमान खान एकमेकांचे चांगले मित्र होते. एकत्र फिरायला जाणं, पार्टी करणं या सर्व गोष्टी ब्रेकअपनंतर दोघांनी सुरू ठेवलं होतं. सलमानला अर्जुन कपूर आपला मोठा भाऊ मानत असे. त्याच्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, “सलमान माझा भाऊ, माझ्यासाठी तो वडिलांप्रमाणे होता. माझं सर्वकाही तोच होता. त्याने नेहमीच मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे वागवलं. त्याने नेहमीच मला मोठ्या भावाचं प्रेम दिलं जे माझ्याकडे कधी नव्हतं. आयुष्यात मोठा भाऊ किती महत्त्वाचा असतो हे मला सलमानमुळे समजलं.”

आणखी वाचा- वन नाइट स्टँड, प्रेग्नंसी आणि गर्भपात; ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतचा धक्कादायक खुलासा

दरम्यान अर्जुन कपूर सध्या अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. मलायका ही सलमानचा मोठा भाऊ अरबाज खानची पूर्वश्रमीची पत्नी आहे. अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. २०१९ मध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. तर दुसरीकडे अर्पितानं अभिनेता आयुष शर्माशी लग्न केलं. या दोघांनाही दोन मुलं आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor once reacts on why he did breakup with arpita khan know the reason mrj