बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. पुण्यात एका फॅशन इव्हेंटसाठी जात असताना तीन गाड्यांच्या झालेल्या अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता मलायका रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती घरी परतली आहे. अशात तिला भेटण्यासाठी बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिच्या घरी पोहोचला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मलायका अरोरा रुग्णालयातून घरी आल्यानंतर बरेच बॉलिवूड कलाकार तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेले पाहायला मिळाले. सोमवारी अभिनेता अर्जुन कपूर आणि करीना कपूर खान यांनी मलायकाची भेट घेतली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय आणि या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर मलायकाला भेटायला जात असलेला दिसत आहे.

दरम्यान २ एप्रिलला मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मलायका अरोराच्या कारचा अपघात झाला होता. खालापूर टोल प्लाजाजवळ ही दुर्घटना घडली होती. ज्यात तीन कार एकमेकांना धडकल्या होत्या. या अपघातात मलायका अरोराच्या डोक्याला दुखापत झाली होती.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. या दोघांनीही आपलं नातं सर्वांसमोर खुलेपणानं मान्य केलं आहे. मलायका अर्जुनपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. मलायका अरोरा २०१७ मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Story img Loader