अभिनेता अर्जुन कपूर अलिकडे फिटनेससाठी अधिकाधिक मेहनत घेताना दिसतो. जवळपास दिड वर्ष तरी फिटनेससाठी मेहनत घेत त्याने वजन कमी केलं. अर्जुनला सुरुवातीपासूनच वाढत्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण आता पुन्हा एकदा अर्जुन त्याच्या लूकमुळे चर्चेत आला आहे. एका युजरने चक्क अर्जुनच्या ट्रेनरला सोशल मीडियावर मॅसेज केला. हा मॅसेज पाहून अर्जुनला राग अनावर झाला आहे. अर्जुनला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराने देखील पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा – “आर्यनला पाठिंबा दिला पण शाहरुखने मात्र…” अभिनेते शत्रुघ्न सिन्हा किंग खानवर नाराज
आपल्या फिटनेस ट्रेनरला एका युजरने केलेला मॅसेज अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा मॅसेज शेअर करताना अर्जुनने म्हटलं की, “तुमच्यासारख्या लोकांसाठी शेपमध्ये राहणं आणि शरीरयष्टी असणं म्हणजेच फिटनेस आहे. तुमच्यासारखं खरी ओळख न दाखवता पाठीमागून वार करणं मला जमत नाही. मानसिक फिटनेसबाबत जर तुम्ही बोलत असाल तर मी समोरा-समोर प्रत्येक परिस्थितीला तोंड देतो. पण तुमच्यासारखी खोटी ओळख दाखवत त्यामागे लपून राहत नाही.”
आणखी वाचा – ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा बंद होणार, पण यामागचं नेमकं कारण काय?
अर्जुनने ट्रोलरला सुनावताच मलायकाने देखील अर्जुनला पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली आहे. “तू अगदी खरं बोलला आहेस. ट्रोलर्सला कधीच डोईजड होऊ देऊ नकोस. पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी तुला अधिक ताकद मिळो.” असं मलायकाने अर्जुनची पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. मलायका अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीला नेहमीच पाठिंबा देताना दिसते. याबाबतीतही ती अर्जुनच्या बाजूने उभी राहिली आहे.
“तु खरंच एक नशिबवान ट्रेनर आहेस. अर्जुनसारख्या व्यक्तीला तू ट्रेन करत आहेस. तू फक्त पैसे कमवत राहा. कारण आकर्षक शरीरयष्टी अर्जुन कधीच मिळवू शकत नाही. कोणत्याच प्रकारची मानसिकता नसलेला हा श्रीमंत मुलगा आहे.” असा मॅसेज या युजरने अर्जुनच्या ट्रेनरला केला होता. पण या मॅसेजला अर्जुनने चांगलंच उत्तर दिलं आहे.