अभिनेता अर्जुन कपूर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, या आधी अर्जुनने ‘कल हो ना हो’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ या दोन चित्रपटात निखिल आडवाणीसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले या विषयी अनेकांना माहित नाही. एका मुलाखतीत अर्जुनने त्याच्या दिग्दर्शनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘बॉलिवूड फिल्म क्लब’च्या क्लब हाऊस सेशन दरम्यान अर्जुनने त्याच्या दिग्दर्शनाचे दिवस कसे होते ते सांगितले आहे. “मी सुरुवात केली तेव्हा मी एक खूप वाईट सहाय्यक होतो. ‘कल हो ना हो’ चित्रपटासाठी मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. मी खरोखरच एक भयानक सहाय्यक दिग्दर्शक होतो. कारण, सुरुवातीला मी सेटवर झोपायचो, निखिल सर सेटवर आल्यानंतर मी सेटवर येत होतो. १५ मिनिटाच्या कामाला मी ४ तास लावायचो. मी खूप चांगला नव्हतो, परंतू सेटवर सगळ्यांना मी आवडायचो. मग मी ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मी चांगल काम करत होतो. काय काम करायचं असतं हे मी शिकलो आणि मला कळलं की मी क्षमतेनुसार एक चित्रपट बनवू शकतो,” असे अर्जुन म्हणाला.

आणखी वाचा : ‘निक प्रियांकाला १० वर्षांमध्येच घटस्फोट देईल?’; केआरकेची धक्कादायक भविष्यवाणी

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे अभिनेता झाला असे म्हटले जाते. सलमानने अर्जुनला वजन कमी करण्यासाठी खूप मदत केली होती. २०१२ मध्ये अर्जुनचा ‘इश्कजादे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अर्जुनने त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

आणखी वाचा : क्रिती सेनॉनच्या ‘मीमी’चा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, अर्जुन लवकरच ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. या चित्रपटात अर्जुन व्यतिरिक्त सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडीस आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १७ सप्टेंबर रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader