अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा वर्षभरापासून होत्या पण, दोघांनीही आपलं नातं सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणत या दोघांनीही आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगायला सुरूवात केली आहे. रिअॅलिटी शोचा सेट असो, मलायकाचा वाढदिवस असो किंवा मग एखादी पार्टी मलायका- अर्जुन बिनधास्त एकत्र वावरताना दिसत आहेत. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये मलायकाने काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. तेव्हा करणने मलायका- अर्जुनच्या लग्नाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता अर्जुनने बहीण जान्हवीसोबत या चॅट शोमध्ये हजेरी लावली. अर्जुनने पहिल्यांदाच या शोमध्ये लग्नासाठी तयार असल्याची कबुली दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करणने अर्जुनला त्याचं ‘रिलेशनशीप स्टेटस’ विचारलं तेव्हा, मी सिंगल नाही असं उत्तर अर्जुनने दिलं. अर्जुनच्या या उत्तराने जान्हवीसुद्धा आश्चर्यचकीत झाली.
आता अर्जुन सिंगल नाही असं म्हटल्यावर पुढे त्याच्या लग्नाचा प्रश्न आलाच. त्याविषयी अर्जुन म्हणाला की, ‘हो, मी आता लग्नासाठी तयार आहे. आधी नव्हतो.’ पुढच्या वर्षी अर्जुन-मलायका विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे नवीन वर्षात कपूर कुटुंबात लगीनघाई पाहायला मिळणार असं म्हणायला हरकत नाही.

अरबाज- मलायका हे दोघंही वर्षभरापूर्वी विभक्त झाले. त्यानंतर अरबाजनं प्रेयसी जॉर्जिया एण्ड्रीयानी सोबत नव्या आयुष्याला सुरूवात केली. जॉर्जिया आणि अरबाज दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे अर्जुनसोबत आता मलायकानं नवीन आयुष्याला सुरूवात करण्याचं ठरवलं आहे. मलायका ४५ वर्षांची आहे तर अर्जुन ३३ वर्षांचा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor reveals he is not single and also says he is open to marriage
Show comments