बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्याची विशेषता अर्जुन आणि त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा यांची सोशलम मीडियावर बरीच चर्चा असते. काही महिन्यांपूर्वीच अर्जुन कपूरनं मलायकाच्या अपार्टमेंटच्या जवळच एक ४ बेडरुम असलेलं एक घर विकत घेतलं होतं. पण आता हे घर त्यानं घेतलेल्या किंमतीपेक्षाही कमी किंमतीत विकल्याची चर्चा आहे. या संपूर्ण व्यवहारात अर्जुनचा तोटा झाल्याचं देखील बोललं जात आहे.

अर्जुन कपूरनं काही महिन्यांपूर्वीच मलायकाच्या अपार्टमेंटच्या जवळ एक घर घेतलं होतं. ज्याची किंमत तब्बल २० कोटी रुपये एवढी होती. मात्र आता हे घर अर्जुन विकलं आहे. मात्र त्याने हे घर विकण्याचं कारण किंवा कोणाला विकलं याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अर्जुनने २० कोटी रुपयांना घेतलेलं हे घर त्याहून कमी किंमतीत म्हणजेच १६ कोटी रुपयांना विकलं आहे. या व्यवहारामुळे अर्जुनचं नुकसान झालं आहे. त्याला ४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

आणखी वाचा- मलायका अरोराला आहे ‘या’ गोष्टीची सवय, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने केला खुलासा

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार अर्जुन कपूरचं हे घर ४३६४ स्क्वेअर फुट एरियाचं होतं. या घराची सेल डॉक्युमेंटचं रजिस्टर १९ मे २०२१ ला झाली होती. ही सर्व कागदपत्र अर्जुनची मोठी बहीण अंशुला कपूरनं साइन केली होती. हे घर जिथे आहे तिथून वरळी सी फेसचा सुंदर देखावा दिसतो. या घरात स्पा, लायब्ररी, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ कोर्स अशाप्रकारच्या लग्झरी सुविधा आहेत. अर्जुन आता जुहूमधील ‘रहेजा ऑर्किड’मध्ये राहतो. तर मलायका ’81 Aureate’ नावाच्या टॉवर बिल्डिंगमध्ये राहते. याच बिल्डिंगमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि करण कुंद्रा यांचंही घर आहे.

अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तो ‘एक व्हिलेन रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘कुत्ते’ आणि ‘द लेडी किलर’ असे दोन चित्रपट आहेत. अर्जुन कपूरच्या नेटवर्थबद्दल बोलायचं तर त्याची नेटवर्थ २०२२ च्या रिपोर्टनुसार ७४ कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो ५-७ कोटी रुपये एवढं मानधन घेतो.

Story img Loader