बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती. हे दोघं बऱ्याच वेळा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकताच अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मलायकाचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत ‘न्यूड मील’ नावाच्या तिच्या प्रोजेक्टबद्दल सांगताना मलायका दिसली. तर व्हिडीओ शेअर करत ‘आता कोणतेही रहस्य नाही..तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मी एक खास काही बनवलं आहे. माझ्यासोबत चवदार आणि पौष्टिक जेवण खाण्यास तयार व्हा,’ अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने दिले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका
दरम्यान, मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने तिचा हा व्हिडीओ शेअर करत ‘मी वाट पाहू शकतं नाही’, असे कॅप्शन दिले आहे. रविवारी मलायकाने अर्जुनचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ‘माझा रविवार असा असतो,’ अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले होते. तर, मलायकाने एमटीव्हीवरील ‘सुपर मॉडेल सीझन २’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.