अभिनेता अर्जुन कपूरने आज इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे. कारण या फोटोत त्याच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे. काय आहे कारण, चला पाहूया.

अर्जुन कपूरच्या ‘की एँड का’ या चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली. या निमित्त त्याने हा फोटो शेअर केला आहे. तसंच या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दलही आपलं मत व्यक्त केलं आहे. या चित्रपटाची आठवणही त्याने या फोटोच्या कॅप्शनमधून सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तो म्हणतो, “की एँड का चित्रपटाच्या वेळची एक आठवण…. सेटला आणि माझ्या ऑनस्क्रिन ‘की’ला मिस करत आहे. हा चित्रपट माझ्या जवळचा आहे कारण तो मी माझ्या आईसाठी केला होता आणि करीना तसंच बल्की सरांसोबत काम केल्यामुळे तर तो अधिकच जवळचा आहे. मला वाटतंय आपण याचा सिक्वेल करावा. तुला काय वाटत आहे करीना?”

त्याच्या चाहत्यांनी त्याला यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी आपल्याला हा चित्रपट आवडल्याचं सांगितलं तर काहींनी या चित्रपटाचा सिक्वेल यावा अशी इच्छाही व्यक्त केली आहे.

अर्जुनने या आधी सांगितलं होतं की, हा चित्रपट त्याच्यासाठी फार महत्त्वाचा होता  आणि “मला माझ्या आईसारखं व्हायचं आहे” ही फक्त एक ओळ ऐकून अर्जुन हा चित्रपट करण्यास तयार झाला होता.

गेल्या महिन्यात अर्जुनचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्राही दिसून आली. मात्र करोना प्रादुर्भावामुळे हा चित्रपट फारसा चालला नाही. अनेक दिवस या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं.

 

 

Story img Loader