सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी ‘तेवर’ चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘इशकजादे’ सारखीच रांगडी भूमिका ‘तेवर’ मध्ये निभावण्यास मिळाल्याने अर्जुनही या चित्रपटासाठी उत्सुक आहे. मोशन पोस्टरवरून या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीतील आग्रा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या परिसरात झाल्याचा अंदाज आहे.
‘टू स्टेट्स’, ‘फाईडींग फॅनी’ या चित्रपटांतील अर्जुनच्या भूमिकांना चांगली दाद मिळाली होती. या चित्रपटातील त्याच्या रांगड्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
सोनाक्षी, अर्जुनच्या ‘तेवर’चे मोशन पोस्टर
सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी 'तेवर' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
First published on: 16-10-2014 at 05:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor sonakshi sinhas tevar oozes a lot of attitude