सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरच्या आगामी ‘तेवर’ चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘इशकजादे’ सारखीच रांगडी भूमिका ‘तेवर’ मध्ये निभावण्यास मिळाल्याने अर्जुनही या चित्रपटासाठी उत्सुक आहे. मोशन पोस्टरवरून या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीतील आग्रा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या परिसरात झाल्याचा अंदाज आहे.
‘टू स्टेट्स’, ‘फाईडींग फॅनी’ या चित्रपटांतील अर्जुनच्या भूमिकांना चांगली दाद मिळाली होती. या चित्रपटातील त्याच्या रांगड्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा