बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या ‘भूत पोलिस’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच अर्जुनचा ‘बक बक विथ बाबा’ हा नवीन चॅट शो आला आहे. या चॅट शोमध्ये यावेळी जॅकलिन फर्नांडिसने हजेरी लावली. दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देऊ न शकलेल्या जॅकलिनवर अर्जुन संतापला आणि तिला त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून निघून जाण्यास सांगितले.

अर्जुनने या चॅट शोचा एपिसोड त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या मुलाखतीत अर्जुनने जॅकलीनला जेवणाविषयी प्रश्न विचारला की आनंदी आणि दुःखी असताना ती काय खाते? यावर उत्तर देत जॅकलिन म्हणाली, ‘मी फक्त ताकद मिळवण्यासाठी खाते.’ जेव्हा अर्जुनने तिला आपल्या भावनांचा आणि जेवणाचा संबंध सांगितला आणि विचारले की याचे तुझ्या आयुष्यात काय महत्त्व आहे का? त्यावर ती म्हणाली, ‘नाही.’ यावर अर्जुन म्हणाला, ‘कृपया माझ्या व्हॅनमधून निघून जा’ आणि ते दोघे हसू लागतात.

आणखी वाचा : समांथा आणि नागा चैतन्य खरंच विभक्त होणार? समोर आली भविष्यवाणी

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

दरम्यान, जॅकलिन, अर्जुन यांचा ‘भूत पोलिस’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात जॅकलिन, अर्जुनसोबत सैफ अली खान आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

 

Story img Loader