आपले वडील आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांना झालेल्या अपघातानंतर अनेकांनी केलेल्या विचारपूसबद्दल अर्जुन कपूरने सर्व शुभचिंतकांचे आभार मानले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला वाई येथे झालेल्या अपघातात बोनी कपूर यांच्या गाडीला एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली होती. या अपघातात बोनी कपूर सुखरूप बचावले. याविषयी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, नशिबानेच माझे वडील फार मोठ्या अपघातातून बचावले. या कठीण प्रसंगी तुम्ही दाखविलेल्या काळजीपोटी मी सर्वांचा आभारी असून, तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो. माझे वडील व्यवस्थित असून, प्रवासदेखील करत आहेत. नशिबाने, ते ज्या गाडीने प्रवास करत होते तिने ट्रॅक्टरची धडक सहन केली… अपघाताच्या वेळी महामार्गावरून हा ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने येत होता. अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचा अभिनय असलेला आणि स्वत:च्या निर्मितीसंस्थेद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या ‘तेवर’ या अगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोनी कपूर वाईमध्ये असताना हा अपघात झाला होता.

Story img Loader