दिग्दर्शक मोहीत सुरू याच्या हाफ गर्लफ्रेण्ड या आगामी चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली असून, चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार आहे.
लेखक चेतन भगत याच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या पुस्तकावरील आधारीत या चित्रपटाचा स्वत: चेतन भगत हा सह-निर्माता आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाल्याची बातमी देखील खुद्द चेतन भगत यानेच आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली. चित्रपटाच्या सेटवर बास्केटबॉल खेळत असतानाचे अर्जुनचे छायाचित्र चेतन भगतने ट्विट केले आहे.

Story img Loader