सध्या मुंबईतील पाऊस सर्वांनाच भूरळ घालत आहे. अगदी सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. अशात अभिनेत्री मलायका अरोराची सोशल मीडिया पोस्ट देखील बरीच चर्चेत आहे. मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवर अर्जुन कपूरचे काका संजय कपूर यांनी कमेंट केली आहे. ज्याची सर्वाधिक चर्चा होत आहे.

मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “वातावरण एवढं रोमँटिक आहे तर अशात एक थ्रोबॅक तर बनतोच” या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन यांच्या पॅरीस ट्रीपची झलक पाहायला मिळत आहे. आठवड्याभरापूर्वीच अर्जुन कपूरचा ३७ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघंही पॅरिसला गेले होते. याच व्हेकेशन ट्रीपचा एक रोमँटिक व्हिडीओ मलायकानं आता शेअर केला आहे.

आणखी वाचा- “तिचे ओठ एवढे जाड…” अनिल कपूर यांनी शिल्पा शेट्टीबद्दल केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

मलायकाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील कमेंट्स केल्या आहेत. पण सर्वाधिक चर्चा होतेय ती अर्जुन कपूरचे काका संजय कपूर यांच्या कमेंटची. संजय कपूर यांनी मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘व्वा व्वा’. संजय कपूर यांची कमेंट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. याशिवाय संजय कपूर यांची महिप कपूरनं देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

आणखी वाचा- ‘वडापाव खाल्ला काय…’ आता हे काय नवीन? माहीत नाही तर हा व्हिडीओ पाहाच

दरम्यान मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं तर दोघांनीही २०१९ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. दोघांच्या वयात असलेल्या फरकामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे.

Story img Loader