बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे. अर्जुन कपूर हा त्याच्या फिटनेसमुळे ओळखला जातो. आज अर्जुनचे सिक्स पॅक अॅब्स आहेत. पण एकेकाळी त्याचं वजन तब्बल १४० किलो होतं. त्याला अस्थमाचाही त्रास होता. अर्जुन १० सेकंद सुद्धा धावू शकतं नव्हता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याच्या काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया..
अर्जुन आता त्याच्या फिटनेसच्या बाबतीत फार जागरुक असतो. तो नियमित जिमला जातो. तिथे वेट ट्रेनिंग, कार्डिओ असे बरेच व्यायाम प्रकार करतो. करिअरच्या सुरुवातीला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने अर्जुनला व्यायामाचे धडे दिले असंही म्हटलं जातं. तर अर्जुनने एका महिन्यात १० किलो वजन कमी केलं होतं, असे ही म्हटले जाते. अर्जुन एक खवय्या आहे. पण आता त्याने खाण्यापिण्यावर बरंच नियंत्रण मिळवलं आहे.
View this post on Instagram
अर्जुनचा दिवस भराचा आहार हा ठरलेला आहे. सकाळी नाश्त्याला चार ते सहा अंडी आणि टोस्ट, दुपारी जेवणात बाजरीची भाकरी किंवा चपाती यांसोबतच भाज्या, डाळ, चिकन यांचाही त्याच्या जेवणात समावेश असतो. तर वर्कआऊटनंतर अर्जुन प्रोटीन शेक, संध्याकाळी अननस, स्ट्रॉबेरीसारखी फळं तो खातो. अर्जुनने जंक फूड आणि गरजेपेक्षा अधिक खाणं बंद केलं आहे. सुरुवातीला तो एका वेळी सहा बर्गर खाऊ शकत होता.
आणखी वाचा : सोसायटीत भांडण आणि चेअरमनला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक
अर्जुन आठवड्यातील सहा दिवस वर्कआऊट करतो. पहिल्याच वर्षात अर्जुनने २२ किलो वजन कमी केलं होतं. त्याने योगासनांवरही भर दिला आहे. तर, करोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यावेळी ही अर्जुनने वजन कमी केले आहे. त्याचे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
आणखी वाचा : चक्क बाथ्रोबमध्ये गोवा-मुंबई विमान प्रवास? अभिनेत्याचे कृत्य पाहून नेटकरी हैराण
अर्जुन कपूरने २००३ पासून कलाविश्वात कामाला सुरुवात केली. शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. याशिवाय ‘नो एण्ट्री’ आणि ‘वाँटेड’ या चित्रपटांसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. ‘इशकजादे’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर सध्या अर्जुन मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.