बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. करीनाने त्या दिवशी तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला. करीना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदिवला गेली होती. करीनाच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. मात्र, या सगळ्यात करीनाचा जवळचा मित्र आणि अभिनेता अर्जुन कपूरने तिला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्याने गुरुवारी म्हणजेच करीनाच्या वाढदिवसाच्या २ दिवसांनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सैफ अली खान, करीना, अर्जुन आणि तैमूर दिसत आहेत. हा फोटो भूत पोलिसच्या चित्रीकरणा दरम्यानचा आहे. या फोटोत अर्जुन तैमूरसोबत खेळताना दिसत आहे. तर पाठी करीना बसल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत, ‘उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. टिम, नवाब साहब आणि मी आमचा हा फोटो पोस्ट करण्यासाठी मला फक्त एक निमित्त हवे होते आम्हाला सगळ्यांना माहित आहे की प्रत्येक वेळी तू सगळ्याचं लक्ष केंद्रीत करून घेशील,’ अशा आशयाचे कॅप्शन अर्जुनने त्या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : करीनाने शेअर केला बिकिनीमधील मिरर सेल्फी; कॅप्शनमध्ये म्हणाली, “चला उन्हाळा…”
आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा
करीना आणि अर्जुनने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘की अँड का’ या चित्रपटामध्ये काम केले होते. तर ‘भूत पोलिस’ या चित्रपटातून पहिल्यांदाच अर्जुन आणि सैफची जोडी मोठ्या पडद्यावर दिसली आहे. तर करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीना आमिर खानसोबत दिसणार आहे.