अभिनेता अर्जुन कपूरने अलीकडेच छोट्या केसांची हेअरस्टाईल धारण केली. कोणत्याही चित्रपटासाठी ही केशरचना केली नसून, वाढत्या उन्हाळ्यामुळे केस छोटे कापले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. केस खुपच वाढले होते आणि त्याला मी कंटाळलो होतो. म्हणून मी केस कापले. या मागे कोणतीही योजना नव्हती. उन्हाळ्या खूपच असह्य झाल्याने केस कापण्याचा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला. छोट्या केसांच्या नव्या अवतारातील आपला फोटो अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केला. ‘अर्थ अवर’चा ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’म्हणून रविवारी दिल्लीत आलेल्या अर्जुनने पत्रकारांशी बोलताना आपल्या नव्या केशरचनेबाबत खुलासा केला. पिळदार शरीरयष्टीच्या अर्जुनला याबाबत विचारले असता तो म्हणाला, मी कोणत्याही चित्रपटासाठी शरीरयष्टी कमवत नसून, गेल्या अनेक दिवसापासून मी नित्यनेमाने व्यायाम करायला सुरुवात केली आहे. त्याचा हा परिणाम आहे. ‘तेवर’ या शेवटच्या चित्रपटात दिसलेल्या अर्जुनने ‘यश राज फिल्म्स बॅनर’तर्फे तयार करण्यात येत असलेला चित्रपट स्वीकारला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक खुलासा करण्यास नकार देते. तो म्हणाला, लवकरच यशराजतर्फे या चित्रपटाची घोषणा करण्यात येईल. अभिनेत्याने चित्रपटाची घोषणा करणे उचित नसून, निर्मात्यांकडून प्रथम चित्रपटाची घोषणा झाल्यावर मी चित्रपटाविषयी बोलणे योग्य ठरेल. या वर्षाच्या मध्यात चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचे तो म्हणाला. त्याशिवाय अर्जुन आपल्या वडिलांच्या ‘दी कन्फेशन ऑफ सुलतान डाकू’ या पुस्तकावर आधारित चित्रपटात एका दरोडेखोराची भूमिका साकारणार असल्याचेदेखील ऐकीवात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा