बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान यांनी आपण एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या हिट जोडीचे एकमेकांपासून वेगळे होण्याचे कारण काय? असा प्रश्न  नक्कीच त्याच्या चाहत्यांना पडला असेल.
दोघात तिसरा आता सगळं विसरा.. अशी आपल्यात म्हण आहे. त्यानुसार हृतिक आणि सुझानच्या नात्यातला तिसरा व्यक्ती म्हणजे अर्जुन रामपाल असल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. हृतिक-सुझानची अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर यांच्याशी खूप चांगली मैत्री आहे. पण, सुझान आणि अर्जुन यांच्यामधल्या वाढत्या मैत्रीमुळे हे दोघेही घटस्फोट घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत कळताच मॉडेल-अभिनेता अर्जुनने आपले मौन सोडले असून, ही एक अफवा असल्याचे तो म्हणाला. याप्रकरणी आपले नाव उगाचच गोवले जात आहे. आपल्या फार जवळ असणारे मित्रमैत्रीण जेव्हा एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतात त्यावेळेस खूप वाईट वाटते. त्यांच्यासाठी ही फार कठीण वेळ आहे. याबाबत कोणतीही अफवा पसरविण्यापेक्षा त्यांच्या निर्णयास संवेदनशीलतेने घेणे गरजेचे आहे. हृतिक-सुझानचे नाते तुटण्यामागे आपले नाव गोवण्यात आल्याने दुःख झाल्याचेही अर्जुन म्हणाला आहे. अलीकडेच त्याने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे.
याआधी, हृतिकचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले जात होते. ‘काइट’ चित्रपटातील त्याची सहकलाकार आणि मॅक्सिकन अभिनेत्री बार्बरा मोरीसोबत ऋतिकची जवळीक वाढल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा