अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डिमिट्रिएड्स सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. तर काही वेळा तिच्या पोस्टवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. आताही काहीसं असंच घडलंय. गॅब्रिएलानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. पण ट्रोल करणाऱ्याला गॅब्रिएलानं चांगलंच सुनावलं.
गॅब्रिएलानं इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘तुझे ओठ पाहून असं वाटतंय की तुला मधमाशी चावली आहे. तुम्हाला मधमाशी चावल्याशिवाय चांगलं वाटत नाही.’ युजरच्या या कमेंटला उत्तर देत गॅब्रिएलानं लिहिलं, ‘हाहाहा, खरं तर मला मधमाशी चावलेली नाही. माझे ओठ नैसर्गिकरित्या एवढे सुंदर आहेत.’ गॅब्रिएलानं फारच मजेदार अंदाजात या युजरची बोलती बंद केली.
अर्थात अशाप्रकारे आपल्या लूकमुळे ट्रोल होण्याची गॅब्रिएलाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा अशाप्रकारे तिच्या फॅशन आणि लूकवरून तिची खिल्ली उडवली गेली होती. काही दिवसांपूर्वी एका युजरनं तिच्या फोटोवर कमेंट करताना तिची लाइफस्टाइल वाईट असल्याचं म्हटलं होतं. ज्यावर गॅब्रिएलानं त्याला मजेदार उत्तर दिलं होतं आणि त्यामुळे ती चर्चेतही आली होती.
दरम्यान गॅब्रिएला आणि अर्जुन मागच्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांना एक मुलगा देखील आहे. मात्र त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाबाबत बरीच उत्सुकता आहे.