अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या अभिनयासोबत त्याच्या फिटनेससाठी देखील ओळखला जातो. सध्या मात्र अर्जुन रामपाल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. अर्जुनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामगचं कराण म्हणजे या व्हि़डीओतील अर्जुन रामपालचा हटके लूक. अर्जुन नव्या लूकमुळे  चांगलाच चर्चेत आला असून अर्जुन रामपाल अगदी ह़ॉलिवूड स्टार दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन रामपालला ओळखणंही कठिण होतंय. कारण अर्जुनने नवी हेअर स्टाइल केली असून त्याने केसाला प्लेटिनम कलर केला आहे. अर्जुनचा हा प्लेटिनम ब्लाँड लूक पाहून नेटकरीदेखील थक्क झाले. सेलिब्रिटी हेयर ड्रेसर आलिम हाकीम याच्या सलूनमधून बाहेर येत असतानाच अर्जुनला स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी फोटोग्राफर्स अर्जुनचे फोटो काढण्यासाठी त्याला विनंती करत असल्याचं दिसतं आहे.

हे देखील वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बापूजींचं हे रुप पाहिलंत का?; पत्नी आहे खूपच ग्लॅमरस

अर्जुन रामपालच्या या नव्या लूकवर त्याचे चाहते कमेंट करून पसंती देत आहेत. एक युजर म्हणाला, ” हा अर्जुन रामपाल आहे, मला वाटलं कुणी हॉलिवूड स्टार आहे.” तर दुसरा युजर म्हणाला, “मस्त हेअर कलर आहे.” अर्जुनच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या लूकचं कौतुक केलंय.असं असलं तरी काही पॅन्सना मात्र त्याचा हा लूक आवडलेला नाही. अर्जुन रामपालला कायम वेगवेगळ्या हेअर स्टाइल करणं आवडतं वेगवेगळ्या हेअर स्टाईलमधील अनेक फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

हे देखील वाचा: अक्षय कुमारमुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक; चारचौघांत करायला लावलं होतं ‘ते’ कृत्य

अर्जुन रामपाल ‘नेल पॉलिश’ या बेव सीरिजमध्ये झळकला होता. तर कंगना रणौतसोबत येत्या काळात तो ‘धाडक’ सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 21 ऑक्टोंबर 2021ला रिलीज होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun rampal platinum blonde hair new look goes viral fan said he looks like hollywood star kpw