अभिनेता अर्जुन रामपाल सध्या काही खास माणसांसोबत वेळ घालवत आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि मुलासोबत मस्ती करतानाचा फोटो आणि व्हिडिओही त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनीही त्याच्या या पोस्ट्सवर कमेंट्स केल्या आहेत आणि या परिवाराचं कौतुक केलं आहे.

अर्जुन आपला मुलगा आरिकचे फोटो, व्हिडिओ कायमच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. हा फोटो शेअर करताना त्याने लकी मी असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोला त्याच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

काही दिवसांपूर्वीच त्याने आरिकचा झोपताना तो त्याला किस करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅब्रियेला आणि मुलगा आरिक यांच्यासोबत राहतो. यंदा त्या तिघांनीही घरातच रंगपंचमी साजरी केली. यासाठी त्यांनी पारंपरिक पांढरे कपडेही परिधान केले होते.

फक्त अर्जुनच नाही तर गॅब्रियेलाही परिवारासोबतचे फोटो शेअर करत असते. गॅब्रियेला एक मॉडेल आहे. तिने काही दिवसांपूर्वीच आपला मुलगा आरिकचा स्वयंपाक करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

Story img Loader